शिंदे गटातील आमदार पुन्हा मातोश्रीच्या संपर्कात ?
मुंबई ( प्रतिनिधी ) - राज्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत . त्यामुळे हे आमदार आता पुन्हा एकदा ' मातोश्री'च्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत .
अनेक राजकीय घडामोडीनंतर अस्तित्वात आलेल्या शिंदे सरकारमध्ये बहुप्रतिक्षित विस्तारानंतर नाराजीची चर्चा उघडपणे होऊ लागली आहे . तर काही आमदारांना आता पुन्हा एकदा स्वत्वाची ओढ लागली आहे . त्यामुळे राज्यात पुन्हा सत्तासंघर्ष रंगण्याची शक्यता आहे . राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार एकाच टप्प्यात करावा अशी मागणी एकनाथ शिंदे गटातील आमदारांचीहोती .
मात्र , भाजपाच्या दबावामुळे तो आता दोन टप्प्यात होणार आहे . त्यात पहिल्या टप्प्यात संधी न मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे . बच्चू कडू यांनी आपली नाराजी उघड करताना एकनाथ शिंदेंसोबत पहिल्यांदा गेलेल्या आमदारांना वगळून नंतर गेलेल्या आमदारांना मंत्री पद देण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त केली . कडू यांनी यामुळे काही आमदार नाराज असल्याचे स्पष्ट केले होते .
त्याचबरोबर अनेक आमदारांनी शिवसेना पक्ष ठाकरेंच्या हाती कायम रहावा अशी इच्छा आहे पण शिवसेना पक्ष , चिन्ह काबीज करण्याचा प्रयत्न शिंदे गटातील काही आमदारांना मान्य नाही . तर काही आमदारांना भाजपातनाही . तर काही आमदारांना भाजपात विलीनीकरण करण्याचा पर्याय मान्य नाही . शिवाय मंत्रिमंडळ विस्तारात आवडीची खाती मिळणार की नाहीत याची शाश्वती नसल्याने शिंदे गटात नाराजीचा सूर पसरू लागला आहे .


0 Comments