google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आश्रमशाळेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, अधीक्षकाला अटक

Breaking News

आश्रमशाळेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, अधीक्षकाला अटक

 आश्रमशाळेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, अधीक्षकाला अटक

आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर 53 वर्षीय अधिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भद्रावती तालुक्यातील बरांज या गावातील ही खासगी आश्रमशाळा आहे. या प्रकरणात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चंद्रपूर पोलिसांकडे तपास वर्ग करण्यात आला आहे.


जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या निर्देशानुसार हा तपास वरोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नोपाणी यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार अधिक तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. संजय एकनाथ इटनकर असे या आरोपी अधिक्षकाचे नाव असून त्याच्यावर बाललैंगिक छळ कायदा (पॉक्सो), एट्रोसिटी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीची नागपूर येथे वैद्यकीय तपासणी केली जात आहे.


आठवी वर्गात शिक्षण घेणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रम शाळेतील अधीक्षकाने लैंगिक अत्याचार करून पेशालाच काळीमा फासले आहे. हे धक्कादायक प्रकरण हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी आरोपी आश्रम शाळेतील अधीक्षक संजय एकनाथ इटनकर ( वय- 53 ) याच्याविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पण घटनास्थळ चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याचे हे प्रकरण पुढील तपासासाठी भद्रावती पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.


मुलीला चांगले शिक्षण मिळावे. या हेतूने पीडितेच्या आई- वडिलांनी तिला चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रम शाळेत ७ जुलै रोजी टाकले. पण हिंगणघाट येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या पीडितेच्या वडिलांना ४ ऑगस्टला तुमच्या मुलीची प्रकृती खराब आहे, तिला व तिचा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही घेऊन जा, असे शाळेतून सांगण्यात आले. पण सततच्या पावसामुळे पीडितेचे वडील आश्रम शाळेत थोडे उशीराच पोहोचले.


मुलीला सोबत घेऊन हिंगणघाटला परतल्यावर १३ वर्षीय मुलीवर ५३ वर्षीय अधीक्षकांने लैंगिक अत्याचारकेल्याचे पुढे आले. पीडितेला तिच्या वडिलांनी हिंगणघाट येथील घरी आणल्यावर घरमालकीनीने मुलीला प्रकृतीबाबत सहज विचारणा केली. अशातच मुलीसोबत काही तरी अनुचित प्रकार झाल्याचे घरमालकीनच्या लक्षात आले. त्यानंतर हिंगणघाट पोलीस स्टेशन गाठण्यात आले. तक्रारीनंतर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments