वामनराव शिंदे साहेब विद्यालयाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.
सांगोला (प्रतिनिधी) आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाच्यावतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली .
यावेळी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक रमेश पवार यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी या थोर राष्ट्रपुरुषांविषयी आपले विचार व्यक्त केले यावेळी बोलताना मुख्याध्यापक रमेश पवार यांनी लोकमान्य टिळक ,अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्यांनी यापुढील काळात अशा राष्ट्रपुरुषांचा विचार व आदर्श जीवनपद्धतीत वाटचाल करून आपले ध्येय साध्य करण्याचे विद्यार्थ्यांना आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सुवर्णा इंगवले मॅडम यांनी राष्ट्रपुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यामागील हेतू विद्यार्थ्यांना सांगितला सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
0 Comments