google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बियरमधून विष पाजून महिलेचा खून ; दीड महिन्यानंतर झाला उलगडा आटपाडी येथील घटना...

Breaking News

बियरमधून विष पाजून महिलेचा खून ; दीड महिन्यानंतर झाला उलगडा आटपाडी येथील घटना...

 बियरमधून विष पाजून महिलेचा खून ; दीड महिन्यानंतर झाला उलगडा आटपाडी येथील घटना...

आटपाडी येथील महिलेच्या त्रासाला कंटाळून तिला बियरमधून विष पाजून तिचा खून केल्याचा प्रकार पोलीस तपासातून उघडकीस आला असून याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

विद्यानगर येथील मीना जावीर (वय ३८) या महिलेच्या कडून होणारा अपमान आणि त्रासाला कंटाळून बिअरमधून विषारी द्रव्य पाजून तिचा खून करण्यात आला. रवींद्र बबन पांढरे (वय ३३, रा. गोटेवाडी ता. तासगाव), हर्षदा शिवाजी लांडगे (२०, रा. साठेनगर, आटपाडी) व योजना दत्तात्रय पाटील (३२, रा. विद्यानगर, आटपाडी) यांना अटक करण्यात आली आहे.


२४ जून रोजी राजेंद्रने तासगाव येथील कंपनीच्या कार्यालयात बिअरमधून विषारी द्रव्य देऊन तिला संपविण्याचा कट रचला. मीनाच्या मृत्यूनंतर तिच्या भावाने आटपाडी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांना याबाबत शंका असल्याने त्यांनी तपास करत त्यावेळचे कॉल डिटेल्स, घटनास्थळावरील पंचनामा करून तिघांना गजाआड केले.

Post a Comment

0 Comments