google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांचा मोठा विजय

Breaking News

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांचा मोठा विजय

 उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांचा मोठा विजय

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनकवडे यांनी काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मार्गदर्शन यांच्यावर 346 मतांनी मात करत निवडणूक जिंकली आहे . 


लोकसभा आणि राज्यसभा मिळून 528 खासदारांनी त्यांना मतदान केले आहे . ते भारताचे उपराष्ट्रपती बनले आहेत . लोकसभा आणि राज्यसभा मिळून 780 मतदारांपैकी 725 खासदार मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले . मतदानाचे हे प्रमाण 92.94 % होते . जगदीप धनगड यांना 528 मते मिळाली , तर विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मध्ये मिळाली . 


उपराष्ट्रपती पदासारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत मर्यादितमतदार असताना खासदारांची तब्बल 15 मते बाद झाली आहेत , तर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या 4 खासदारांनी मतदानात सहभागच नोंदवलेला नाही . जगदीप धनगड यांना 528 मते मिळाल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे अधिकृतरित्या लोकसभा आणि राज्यसभा मिळून 528 खासदार असल्याचे स्पष्ट झाले आहे . लोकसभेचे सेक्रेटरी जनरल उत्पल कुमार सिंग यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला आहे .

Post a Comment

0 Comments