Breaking News

नगराध्यक्ष पद थेट जनतेतून? शिंदे सरकार,ठाकरे सरकारचा निर्णय बदलणार...

 नगराध्यक्ष पद थेट जनतेतून? शिंदे सरकार,ठाकरे सरकारचा निर्णय बदलणार... 

नागपूर -राज्यातील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडनुकांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोरोना महामारी आणि त्या नंतर OBC आरक्षणाच्या कारणांमुळे राज्यातील महापालिका, नगरपालिका,जिल्हापरिषद तसेच शेकडो ग्रामपंचायतिच्या निवडणुका प्रलंबित आहे.निवडणूक आयोग प्रलंबित निवडणुका घेण्यासाठी पावले उचलत असतांना येणाऱ्या निवडणुका जुन्या पद्धतीने होतील की नाही असा सवाल देखील उपस्थित होऊ लागलाय. 


ठाकरे सरकारने मागील काळात निवडणुकाणसंदर्भात घेतलेले निर्णय शिंदे सरकार रद्द करेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेमधून निवडून यावा, अशी मागणी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बावनकुळे यांनी मागणी केली आहे.जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा निर्णय घेण्यात यावा, असा आग्रह देखील त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केला आहे.


ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय रद्द करावा” युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना नगरपंचायती मध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून यायचे. त्यामुळे पाच वर्ष नगरपालिकेत खेचाखेची राजकारण होत नव्हते, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीने सरकारने देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय बदलून नगराध्यक्ष आणि सरपंच हे जनतेतून निवडून न येता त्यांची निवड निवडून आलेल्या सदस्यांच्या मार्फत केली जाण्याच्या संदर्भात निर्णय घेतला. मात्र, आता पुन्हा सत्तांतर झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केला आहे.आता पुन्हा एकदा सरपंच,नगराध्यक्ष निवड जनतेतून होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments