Breaking News

मिरज रेल्वे गेट १४ जुलै पासून वाहतुकीसाठी खुले होणार शहीद जवान संस्थेच्या पाठपुराव्याला अखेर यश

 मिरज रेल्वे गेट १४ जुलै पासून वाहतुकीसाठी खुले होणार शहीद जवान संस्थेच्या पाठपुराव्याला अखेर यश

सांगोला ( प्रतिनिधी ) : - शहीद जवान संस्थेच्या वतीने १० जून २०२२ रोजी मिरज रेल्वे गेट वाहतुकीसाठी खुला करावा याबाबत रेल्वे प्रबंधक सांगोला व डीआरएम ऑफिस सोलापूर यांना लेखी निवेदन देण्यात आले होते . त्यावेळी त्यांनी ३० जून २०२२ रोजी वाहतुकीसाठी खुले करणार , असे सांगितले होते याबाबत संस्थेकडून ५ जुलै २०२२ रोजी रेल रोको आंदोलन करण्यात येणार होते . व परंतु सोलापूर रेल्वे पोलीस तानाजी पिसे व रेल्वे इंजिनिअर प्रसाद जोशी यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी समक्ष भेटून रेल रोको न करण्याबाबत विनंती केली होती . 

दोन - तीन दिवसात गेट चालू करण्याचेआश्वासन दिले होते . परंतु काल रविवार दिनांक १० जुलै रोजी मार्ग वाहतुकीसाठी खुला न केल्याने शहीद जवान संस्थेने शहरातील नागरिकांना घेऊन रेल आंदोलन करण्याचे ठरवले होते . परंतु रेल्वे ठेकेदार श्री . पाटील यांनी संस्थेची संपर्क करून १४ जुलै २०२२ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्याचे लेखी सांगितले आहे . 

संस्थेने नागरिकांच्या आग्रहाखातर पाठपुरावा केला असून गुरुवार दिनांक १४ • जुलै रोजी मिरज रोड गेट वाहतुकीसाठी • खुला होणार असल्याचे शहीद जवान संस्थेचे अध्यक्ष श्री . अच्युत फुले यांनी सांगितले आहे .

Post a Comment

0 Comments