Breaking News

सांगोला नगरपालिका बिनविरोधसाठी शहाजीबापू पुढाकार घेणार का ?

सांगोला नगरपालिका बिनविरोधसाठी शहाजीबापू पुढाकार घेणार का ?

सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शेकाप , काँग्रेससह माजी नगराध्यक्षा राणी माने यांचे पती आनंद माने व माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार गट , राष्ट्रवादी काँग्रेसने वॉर्डनिहाय बैठका घेऊन मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत .

 परंतु भाजप आणि शिवसेनेने म्हणावी तशी गती घेतली नसली तरी आमदार शहाजीबापू पाटील हे सर्व पक्षातील नेत्यांना एकत्र करून निवडणूक बिनविरोध करणार का याकडे लक्ष लागले आहे . सांगोला नगरपरिषदेची स्थापना १ ९ ५६ मध्ये झाली आहे . महाराष्ट्रात क वर्ग नगरपालिकेत सर्वात जास्त भौगोलिक क्षेत्रफळ असलेले सांगोला व म्हसवड या दोनच नगरपरिषदांचा समावेश आहे . शहरात २७ हजार मतदार असून लोकसंख्या ४० हजारांपर्यंत आहे . 

नगरपरिषदेत अकरा प्रभाग असून २३ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत . त्यामध्ये बारा महिला व अकरा पुरुष नगरसेवकांचा समावेश असेल . त्यामुळे महिलाराज येणारआहे . मागासवर्गीयांसाठी तीन जागा राखीव असून इतर वीस जागा सांगोला एम . एम . पठाण महिला आणि पुरुषांसाठी आहेत . 

प्रत्येक प्रभागात एक पुरुष व एक महिला आहे . जर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर किमान आपली पत्नी अथवा मुलाला तरी उमेदवारी मिळावी म्हणून सर्वच पक्षातील नेते व कार्यकर्ते भेटीगाठी घेऊन निवडणुकीचा अंदाज घेत आहेत . आजपर्यंत लोकनियुक्त चार नगराध्यक्ष झाले आहेत . त्यामध्येपृथ्वीराज चव्हाण , छाया पाटील , शकुंतला केदार व राणी माने यांचा समावेश आहे . 

शहरात आनंद माने , शेकाप व नवनाथ पवार गटाने एकत्र येऊन विरोधकांना आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे . विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील , माजी आमदार दीपक साळुंखे पाटील , माजी नगराध्यक्ष पी . सी . झपके यांची आघाडी होऊन त्यामध्ये भाजप सहभागी होणार का याकडेही लक्ष लागले आहे . माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार हे सर्व पक्षाच्या नेत्यांना शहराच्या विकासासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहेत . 

भाजपचे शहराध्यक्ष म्हणून पवार यांचे नाव जाहीर झाले होते . परंतु माझा भाजपशी काही संबंध राहिला नसल्याची भूमिका पवार यांनी स्पष्ट केली आहे . मी स्वगृही शेकापमध्ये परतलो असून मी व माझा मुलगा प्रभाग सात व आठमधून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे . तसेच आनंद माने गट व शेकाप एकत्र येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे .

Post a Comment

0 Comments