Breaking News

सांगोला येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न: तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 सांगोला येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न: तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगोला : तालुका प्रतिनिधी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अनेक छोटे मोठे बदल झाले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार हे एखाद्या वटवृक्षाप्रमाणे आजही पाय घट्ट होऊन आपल्या भूमिकेवर ठाम उभे आहेत . राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार अंगीकारलेल्या आजच्या तरुणांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विचार घरोघरी पोहोचविण्यासाठी गावोगावी वाड्यावरराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम हाती घ्यावा असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अमोल काळे यांनी सांगितले .


 शुक्रवार दि . 22 रोजी राष्ट्रवादी भवन सांगोला येथे सांगोला तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली . सांगोला शहर आणि तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तरुणांनी या बैठकीस प्रचंड प्रतिसाद दिल्याने आढावा बैठकीचे रूपांतर जाहीरमेळाव्यात झाले . या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा . आम . दिपकआबा साळुंखे पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील , 

जिल्हा परिषदेचे माजी सभापती अनिल मोटे , राष्ट्रवादीच युवकचे तालुका अध्यक्ष अनिल खटकाळे , मा . नगरसेवक सोमनाथ लोखंडे , जुबेर मुजावर , प्रताप मस्के , विनोद रणदिवे , आलमगीर मुल्ला , राजेंद्र पाटील आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी वकार्यकर्ते उपस्थित होते . पुढे बोलताना सचिव अमोल काळे म्हणाले , 

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या 100 विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक कामावर भर दिला आहे . त्या अनुषंगाने सांगोला शहर आणि तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जाळे विस्तारण्यासाठी आगामी काळात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे . 

2024 च्यालागले पाहिजे . 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या विचारांचा आणि हक्काचा आमदार निवडून देण्यासाठी विशेषतः तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे . सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची ताकद बलाढ्य आहे आगामी काळात तो आणखी बळकट व्हावी यासाठी आजपासून प्रयत्न सुरु करावेत असेही शेवटी प्रदेश सचिव अमोल काळे म्हणाले .

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा . आम .प्रदेश उपाध्यक्ष मा . आम . दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित युवकांना संबोधित करताना म्हणाले , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा केवळ राजकीय पक्ष नसून तो एक परिवार आहे . परिवारातील कोणत्याही सदस्याचे सुख दुःख हे त्या परिवाराचे आहे . 

सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील नव्हे तर कोणत्याही राजकीय पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्ता व नागरिकांसाठी सांगोला येथे आपले राष्ट्रवादी भवन24 तास खोले हे कार्यालय असल्याचेही यावेळी त्यांनी आवर्जून नमूद केले पक्ष पार्टी जात पात पंथ व राजकीय भूमिका न पाहता सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जो आपल्याकडे मदत मागण्यासाठी येईल त्याला देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी दिलेल्या शिकवणीनुसार शक्य ती मदत करणे हेच आपले कर्तव्य मानून

 गेल्या 30 वर्षांपासून आपण राजकारण केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या पुढील काळातहीपक्ष पार्टी जात पात पंथ व राजकारण विरहित समाजकारण करण्यावर भर देणार असल्याचेही शेवटी ते म्हणाले . राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीत कार्याध्यक्ष संभाजी हरिहर , प्रवीण घाडगे , 

 . राज मिसाळ , अक्षय पाटील , ज्ञानेश्वर शिंदे , अनिल मोटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले . 1 ) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी टवी चौगुलेपाटील व सचिव अमोल काळे यांनी निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन केले . 2 ) राष्ट्रवादी काँग्रेसमधे जाती - पातीच्या राजकारणाला थारा नाही माझे पणजोबा , आजोबा आणि वडील यांनी अन्य पक्षात अनेक वर्षे काम केले . 

परंतु आमच्या निष्ठेला आणि कष्टाला तिथे अजिबात न्याय मिळाला नाही . दिपकआबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेशकेला . दुधाच्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या एका सामान्य तरुणाला वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी मला राष्ट्रवादी काँग्रेसने आणि दिपकआबांनी जिल्हा परिषद सदस्य केले . 

जिल्हा परिषद कुठे आहे हे माहीत नसलेल्या एका सामान्य तरुणाला जिल्हा परिषदेचा सभापती केले . हे करतांना कधीही आमच्या नेत्याने आणि पक्षाने माझी जात पात पाहिली नाही . अनिल मोटे , मा . सभापती जि.प. सोलापूर

Post a Comment

0 Comments