सोलापूर : युवकांनो, भारतीय सैन्यात भरती व्हायचे आहे का? अग्निवीर भरती मेळावा ; कधी व कुठे पहा
सोलापूर, दि. ११: भारतीय लष्करामध्ये अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवर भरतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर येथे २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान पुण्यासह सहा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी अग्नीवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
अग्नीवीर जनरल ड्युटी, अग्नीवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लर्क/स्टोअरकीपर आणि अग्नीवीर ट्रेड्समन या पदांसाठी ही भरती होणार आहे. पुणे, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवार या भरती मेळाव्यात भाग घेऊ शकतील.
त्यासाठी https://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. याच संकेतस्थळावर भरतीप्रक्रियेबाबत अधिक माहिती उपलब्ध आहे. या भरती मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी ३० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
भरती प्रकियेसंदर्भातील अधिक माहिती https://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती भरती कार्यालय, मुख्यालय रिक्रुटिंग झोन, पुणेचे संचालक मेजर येसू राजू के यांनी दिली आहे.
सोलापूर : हिप्परगा तलाव परिसरात मित्रांसोबत फिरायला गेलेल्या डेंटल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.
आदित्य अजित चव्हाण (वय 21, रा. आंबाजोगाई) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. केगाव येथील डेंटल कॉलेजमध्ये आदित्य पहिल्या वर्षाला शिकायला होता. काल गुरुवारी सायंकाळी आदित्य त्याच्या मित्रांसमवेत हिप्परगा तलाव परिसरात फिरायला गेला होता. तलाव परिसरात फिरताना अचानक पाय घसरून आदित्य पाण्यात पडला. गाळामध्ये अडकल्याने त्याला बाहेर निघता आले नाही. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. आज शुक्रवारी सकाळी आदित्यचा मृतदेह सापडला.
मूळचा आंबाजोगाई येथील असलेला आदित्य केगाव येथील डेंटल कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याच्या घरी आई, वडील आणि एक लहान भाऊ आहे.
हिप्परगा तलाव परिसरात गेल्यानंतर आदित्यने त्याच्या मोबाईलवरून आईसोबत संवाद साधला होता. घटनेची माहिती कळल्यानंतर त्याचे कुटुंबीय, नातेवाईक सोलापुरात दाखल झाले आहेत.


0 Comments