Breaking News

थरारक ! ओमानच्या समुद्रात जतचे तिघेजण गेले वाहून

 थरारक ! ओमानच्या समुद्रात जतचे तिघेजण गेले वाहून 

खवळलेल्या समुद्राच्या एका लाटेत सारे कुटुंब उद्धस्त झाल्याची घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील जतमधील एक कुटुंब ओमान देशातील समुद्रात पर्यटनासाठी गेले होते. मात्र अचानक आलेल्या लाटेत कुटुंबातील तिघांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेत सांगलीतील शशिकांत म्हणाणे यांच्यासह त्यांची नऊ वर्षांची मुलगी श्रृती आणि सहा वर्षांचा मुलगा श्रेयस याचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. ज्यात दोघं जण वाहून गेल्याचे स्पष्टपणे दिसते.

म्हणाणे हे अनेक वर्षांपासून दुबईत वास्तव्यास आहेत. म्हणाणे हे दुबईतील एका कंपनीत सेल्स मॅनेजर पदावर कार्यरत होते. दरम्यान बकरी ईदनिमित्त सुट्टी असल्याने शशिकांत आपल्या पत्नी, मित्र आणि दोन मुलांसह दुबईजवळील ओमानमधील समुद्र किनारी फिरायला गेले होते.

यावेळी खवळलेल्या समुद्रातून अचानक उसळलेल्या लाटेत कुटुंबातील शशिकांत यांच्यासह त्यांची दोन मुले वाहून गेले आहेत. यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. दोन दिवसांच्या तपासानंतर मुलगा व वडिलांचा मृतदेह सापडला. मात्र, मुलीचा शोध लागला नाही. धक्कादायक बाब म्हणजे शशिकांत यांची पत्नी सारिका यांच्या समोरच ही घटना घडल्याने त्यांच्यावरही मोठा आघात झाला.

Post a Comment

0 Comments