Breaking News

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांच्या विरोधात मुंबई महिलेने लावला हानीट्रॅप.

 भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांच्या विरोधात मुंबई महिलेने लावला हानीट्रॅप.

भाजप जिल्हा अध्यक्ष यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा केला दाखल.

मुंबईत एका महिलेने भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात हानीट्रॅप लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एका महिलेवर मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत आरोपी महिला ही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत मुंबईत घर व दोन कोटी रुपयांची मागणी करत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे संबंधित महिलेने त्यांच्याकडून यापूर्वी टप्प्याटप्प्याने १ लाख ७८ हजार फोन पे व २ लाख रुपये रोखीने स्वीकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


एवढ्यावरच न थांबता त्या महिलेने राजकीय व सामाजिक स्तरावर बदनामी करण्याची धमकी ही दिली आहे. संबंधित महिला ही फिर्यादी देशमुख यांची नातेवाईक आहे. या महिलेविरोधात मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments