Breaking News

शिवसेनेला धक्का , विधिमंडळाकडन गटनेतेपदी एकनाथ शिंदेंच्या निवडीला मान्यता

 शिवसेनेला धक्का , विधिमंडळाकडन गटनेतेपदी एकनाथ शिंदेंच्या निवडीला मान्यता

शिवसेनेचे गटनेते व प्रतोद कोण यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर काल रात्री उशीरा विधीमंडळाच्या सचिवांनी पडदा पाडला . उद्धव ठाकरे यांनी गटनेतेपदी नियुक्त केलेले अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभु यांची नियुक्ती रद्द ठरवली आहे . तर एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते तर भरत गोगावले हेच प्रतोद असणार असल्याचे पत्र सचिवांनी काढले . 


त्यामुळे सध्या शिवसेनेकडे असलेल्या 16 आमदारांना शिंदे यांनी काढलेला व्हीपचे पाळण करणे बंधनकारक ठरणार आहे . शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी गटनेतेपदी चौधरी यांची नियुक्ती केली होती . मात्र शिंदे यांनी त्यांच्याकडे असलेल्या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर त्याला आव्हान देत शिवसेनेच्याप्रतोदपदी असलेल्या सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द करत त्या जागेवर भरत गोगावले यांची नियुक्ती केली होती . 


त्यातच खरी शिवसेना कोणती यावरून शिवसेना व शिंदे गट यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता . यासंदर्भात शिवसेना व शिंदे गटाने विधीमंडळाकडे पत्र दिले होते . त्यानुसार विधीमंडळ सचिवांनी चौधरी यांची गटनेतेपदी व प्रभू यांची प्रतोदपदी असलेली नियुक्ती रद्द ठरवली . विधीमंडळ सचिवांचा हा निर्णय शिवसेनेसाठी मोठा धक्का समजला जात आहे . 


त्यामुळे यापुढे शिवसेनेचे 16 आमदारांना शिंदे गटाने काढलेला व्हीप मान्य करावा लागेल . अन्यथा त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे . दरम्यान , काल झालेल्या विधानसभेच्या विशेषअधिवेशनात या 16 आमदारांनी शिंदे गटाने काढलेला व्हीपचे पालन न केल्याने त्यांच्यावर कोणती कारवाई होते . याकडे लक्ष लागलेले आहे .

Post a Comment

0 Comments