मस्करी सुरु असताना दबले रिव्हॉल्वर चे ट्रिगर आणि …….
दीर आणि भावजय यात थट्टा मस्करीचे नाते असते. दोघेही एकमेकांची थट्टा मस्करी करीत असतात. दिराने वहिनीला रिव्हॉल्वर दाखवून वहिनी बघ मी रिव्हॉल्वर आणली आहे असे म्हटले. त्यावर आरोपी विशाल याचा चुलता कल्पेश याने ती कशी चालते अशी विचारणा केली असता विषलच्या एका मित्राने ट्रिगर ओढून ती विशालच्या हातात दिले हा खेळ सुरू असल्याच्या दरम्यान अचानक रिव्हॉल्वर चे ट्रिगर दबले आणि निघालेली गोळी वहिनी च्या डोक्यात शिरली व त्या धाडकन जमिनीवर कोसळल्या. घटना कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, मयत सुनिता भालेराव यांचा मुलगा कल्पेश भालेराव याने याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. “आई सुनीता भालेराव आज सकाळी केसांना कोरपड लावत होती. याच दरम्यान फिर्यादीचा चुलता आणि त्याचे दोन मित्र घरात आले.
आईला म्हटले की, वहीनी बघ मी बंदूक आणली. याच वेळी आरोपी सिद्धार्थ याला चुलता विशाल यांनी विचारले की बंदूक कशी चालते? सिद्धार्थने देखील बंदूक हातात घेत खटका मागे ओढून पुन्हा विशालच्या हतात दिली. यावेळी घरातील व्यक्तींनी विरोध केला.
मात्र चुलते विशाल यांनी फक्त वहीनीला दाखवण्यास आणल्याचे सांगातले”, अशी माहिती मृतक महिलेच्या मुलाने पोलिसांना दिली आहे. “थट्टा-मस्करीत बंदूक हाताळाणे सुरु होते. याच दरम्यान चुलते विशाल यांच्याकडून ट्रिगर दाबल्या गेल्या आणि आईच्या डोक्यात गोळी लागली. यावेळी आई सुनीता भालेराव रक्ताच्या थोराळ्यात पडल्या.
तर आरोपी विशाल भालेराव, सिद्धार्थ कदम आणि अमोल भालेराव हे तिघे ही बंदूक आणि गोळ्या घेवून फरार झाले”, असं कल्पेश भालेरावने पोलिसांना सांगितलं. दीर विशाल भालेराव याच्याकडून डोक्यात गोळी लागलेल्या सुनीता भालेराव यांना उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फरार आरोपी विशाल भालेराव याला पोलिसांनी अटक केली असून आणखी दोघे आरोपी गायब आहेत.
संबंधित घटना घडल्यानंतर भालेराव कुटुंबियांना पोलीसांनी तपासासाठी शिर्डी पोलीसस्टेशनमध्ये आणण्यात आले. दरम्यान फरार आरोपी विशाल याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गमंती गंमतीत पिस्टल दाखवत असताना गोळी झाडली गेल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी विना परवाना शस्त्र वापरणे, त्याचबरोबर इतर कलमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भादवि 304 , 201 34, 3, 27 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


0 Comments