google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गुप्तधनासाठी आजीकडूनच नातीचा खून, तीन वर्षांनी नरबळी प्रकरणाचा उलगडा

Breaking News

गुप्तधनासाठी आजीकडूनच नातीचा खून, तीन वर्षांनी नरबळी प्रकरणाचा उलगडा

 गुप्तधनासाठी आजीकडूनच नातीचा खून, तीन वर्षांनी नरबळी प्रकरणाचा उलगडा

पाटण तालुक्यातील करपेवाडीत १६ वर्षांच्या मुलीची हत्या झाल्याची घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेत सातारा पोलिसांनी दोन मांत्रिक आणि त्या दुर्दैवी मुलीच्या आजीला तीन वर्षानंतर अटक केली असून या खूनाचा उलगडा झाला आहे. चौकशीमध्ये गुप्तधनासाठी आजीनेच आपल्या नातीचा हा नरबळी दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

२२ जानेवारी २०१९ रोजी करपेवाडी येथे ही हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आलं असून अजून काही आरोपींना शोधण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणात सुरवातीला पोलिसांचा संशय मुलीच्या आई-वडीलांवर होता.

मात्र, तपास सुरु असताना काही संशयीत पुरावे मिळाल्यानंतर ही हत्या आजीकेली असल्याचं उघड झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. आजीने ही हत्या गुप्तधनाच्या हव्यासापोटी करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Post a Comment

0 Comments