मोठी घोषणा ... सरपंचांची आणि नगराध्यक्षांची निवड आता थेट जनतेतून
महाराष्ट्रातील सरपंचांची आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे . ठाकरे सरकारने जनतेतून सरपंचांच्या आणि नगराध्यक्षांच्या निवडीचा निर्णय बदलला होता . या व्यतिरिक्त बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे .
शुक्रवारपासून पुढील 75 दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बस्टर डोस ( वर्धकमात्रा ) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल , अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली . या देशव्यापी मोहिमेसंदर्भात आपली पंतप्रधानांशी काल चर्चा झाली आहे , अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीच्यावेळी दिली .
मुख्यमंत्र्यांनी यावेळी आरोग्य विभागास निर्देश दिले की , या O मोहिमेमध्ये एकही दिवस वायाघालू न देता सर्व संबंधितांना बूस्टर मात्रा मिळालीच पाहिजे यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी , स्वयंसेवी संस्था , आरोग्य संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे . याविषयी पुरेशी जनजागृती करावी , असेही मुख्यमंत्री म्हणाले .
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान टप्पा - 2 च्या धर्तीवर राज्यात देखील स्वच्छ महाराष्ट्र अभियान टप्पा - 2 राबविण्यात येणार आहे . नगरविकास विभागाच्या माध्यमातून शाश्वत घनकचरा व्यवस्थापन , वैयक्तीकघनकचरा व्यवस्थापन , वैयक्तीक घरगुती शौचालय आणि सामुदायिक शौचालय बांधण्याचा निर्णय राबवण्यात येणार आहे , असं शिंदे म्हणाले .


0 Comments