विठुरायाच्या दर्शनाला येताना कासेगाव फाट्यावर अपघात , दोघांचा मृत्यू

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला . या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला असून , तीन जण गंभीर जखमी झाले आहेत . रविवारी पहाटे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव फाटा येथे हा अपघात झाला . या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेतली . राजू संभाजी शिधोळकर ( 45 ) आणि परशुराम संभाजी जवळचे ( 50 ) अर्शी या अपघातातील मृतांची नावे आहेत .

 तसेच , अभिजीत हुंबरे ( 28 ) , गीतेश पोकंशेकर ( 26 ) आणि राजकवि कृष्णा मधुकर ( 23 ) हे गंभीर जखमी झाले आहेत . बेळगाव तालुक्यातील अंनगुळ गावात राहणारे हे रहिवाशी आहेत .

कर्नाटकातील बेळगावमधील अंनगुळ येथील 5 जण विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात होते . सेल्टोस या गाडीने ही पंढरपूरकडे येत असताना आज पहाटे त्यांच्या गाडीला अपघात झाला . या अपघातानंतर जखमी भाविकांवर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत .