Breaking News

मेट्रो कारशेड ,कांजूरमार्ग मधून आरेमध्ये हलविण्याच्या शिंदे-फडणवीस प्रणीत राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात संतप्त तरूणाई रस्त्यावर…

 मेट्रो कारशेड ,कांजूरमार्ग मधून आरेमध्ये हलविण्याच्या शिंदे-फडणवीस प्रणीत राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात संतप्त तरूणाई रस्त्यावर… 

पाठीमागे राज्य सरकारला आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, याबाबत शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडावी, असे निर्देश देण्यात आले असताना 


एकामागून एक घडलेल्या अभूतपूर्व घडामोडींनंतर अखेर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, देव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता लगेचच देवेंद्र फडणवीस कामाला लागल्याचे सांगितले जात आहे

आपल्या कामातून गतीमान शासन प्रशासन आहे. असा संदेश आपण कामांच्या माध्यमातून देऊया. मेट्रोचे प्रकल्प, हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले. यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना काही योजनासंदर्भात निर्देश दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.


रोजी सकाळी ११ वा. भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ DYFI मुंबई,आरे जंगलात राहणारे स्थानिक आदीवासी नागरिक तसेच मुंबईतील विविध पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्था व विविध महाविद्यालयीन युवक – युवतींच्या वतीने आरे जंगलात पिकनीक पाॕईंट येथे सकाळी ११ वा.तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत.


आज युवक – युवतींने मानवी साखळी करीत पुन्हा आरे मध्ये ,कारशेड आणल्यास “आम्ही रोखू” प्राणपणाने लढू, असा इशाराच राज्य शासनाला दिला आहे.सदर निदर्शने व मानवी साखळी लोकशाही व सनदशीर मार्गाने करण्यात आली.


DYFI चा विकासाला किंवा मेट्रोला विरोध नसून,लाखो झाडांच्या कत्तली करून आरे जंगल परिसराचे सिमेंटीकरण करण्याला विरोध आहे.या जंगलात आजही वन्य जीव व आदीवासी नैसर्गिक पर्यावरणात राहत आहेत.आरेचे जंगल हे मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाते.याच जंगलात ३ नद्यांचे उगमस्थान आहे.काही दिवसांपूर्वीच येथे बिबट्याचा बछडा आढळळला आहे.पर्यावरणाचा -हास करून होणारा अमानवी विकास आम्हाला नको असे स्थानिकांचे व संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी संजीव शामंतूल म्हणाले


DYFI ने गेल्या वेळेसपण शेकडो युवक-युवतींना “सेव्ह आरे” मोहीमेत जोडले होते.आता देखील संघटना स्थानिक आदीवासी नागरिक यांच्या खांद्याला खांदा लावून लोकशाही पद्धतीने आरे वाचविण्याचे आंदोलन पुढे नेईल यावेळी असे मत संघटनेचे राज्य कमिटी सदस्य प्रविण भास्कर मांजलकर यांनी मांडले

तर 

ठाकरेंचा आदेश फिरवला! मेट्रोचे कारशेड आरे येथेच होणार; फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश..यावर आता पुढं जनता संघर्षात पुढ काय होणार याविषयी प्रश्नःचिन्ह आहे…

Post a Comment

0 Comments