Breaking News

विजेबाबत उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…

 विजेबाबत उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिवसा वीज देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, सर्व सोलर पंपांनाही मंजुरी मिळणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले..

गडचिरोलीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच पाहणी केली. त्यावेळी काही ग्रामस्थांनी अशी तक्रार केली, की वीजबिल थकल्याने महावितरणने ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचे कनेक्शन तोडले. या पार्श्वभूमीवर आज संबंधित विभागांची (ता. 13) बैठक झाली.

शेतकऱ्यांना दिवसा वीज

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, की “2018 मध्ये आपण ‘एक मुख्यमंत्री सौरवाहिनी योजना’ सुरु केली होती. त्यात ‘अॅग्रीकल्चर फिडर’च्या माध्यमातून सोलरद्वारे दिवसा वीज देता येणार आहे. त्यावेळी आपण 200 मेगावॅटचे काम केलं आहे.. मात्र, नंतर त्यास ‘ब्रेक’ बसला. आता पुन्हा एकदा ही योजना जलदगतीने पूर्ण करणार आहोत…

अनेक गावांच्या पाणीयोजना, तसेच पथदिवे हे बिल थकल्याने बंद आहेत.. चक्रवाढ व्याजामुळे थकबाकीचा आकडा फुगला आहे.. ही थकबाकी भरण्यासाठी ‘वन टाइम सेटलमेंट’ करता येईल. राज्य सरकार ग्रामपंचायतींना मदत करील, त्यातून ही बिले भरावीत व सगळ्या योजना पुन्हा सुरू कराव्यात, असा निर्णय बैठकीत झाल्याचेही फडणवीस म्हणाले..

सर्व सोलर पंपांना मंजूरी

फडणवीस म्हणाले, की 2019 पासून सोलर कृषी पंपाचे अर्ज प्रलंबित आहेत. तब्बल सव्वा लाख लोकांनी सोलर कृषी पंपासाठी अर्ज केलाय. केंद्र सरकारची कुसुम योजना व राज्य सरकारच्या माध्यमातून पुढील 6 महिन्यात ही कामे मार्गी लावली जातील. तसेच उपसा सिंचन योजनाही सोलरवर आणण्याचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments