Breaking News

पाणी मागण्याचा बहाणा करुन चिंचोलीत चाकूने भोकसले - एकाचा जागीच मृत्यू , मारेकरी फरार

 पाणी मागण्याचा बहाणा करुन चिंचोलीत चाकूने भोकसले - एकाचा जागीच मृत्यू , मारेकरी फरार 


केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे अज्ञाताने चाकूने भोकसले : एकाचा जागीच मृत्यू

पाणी मागण्याच्या बहाण्याने आले होते मारेकरी !

गौतम बचुटे/केज :- पाणी मागण्याच्या बहाण्याने आलेल्या तिघांनी पती-पत्नीवर चाकूने वार केल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की दि. ११ जुलै सोमवार रोजी सायंकाळी सुमारे ७:१५ वा. च्या दरम्यान चिंचोली माळी ता. केज येथील रस्त्यावर घर असलेल्या पांडुरंग राऊत यांच्या घरी तोंडाला स्कार्फ बांधलेले तीन अनोळखी व्यक्ती गेले. त्यांनी त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले. पत्नी शशिकला राऊत ही पाणी घेऊन येताच त्या तीन अज्ञात चोरट्यानी तिच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले. या वेळी शशिकला हिचा पती पांडुरंग राऊत हा विरोध करीत असताना अज्ञाताने त्याला चाकू भोकसला. या झटापटीत त्याची पत्नी शशिकला राऊत ही देखील जखमी झाली आहे. मारेकऱ्यांनी खून करून पळून जाताना कोणाला दिसू नये आणि ओळख पटू नये म्हणून घरातील विजेचा बल्ब काढून अंधार केला. चाकूचा घाव वर्मी बसताच पांडुरंग राऊत याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी अज्ञात मारेकरांचा तपास घेण्यासाठी नाकाबंदी केली आहे.

Post a Comment

0 Comments