Breaking News

सायकल विक्रमवीर नीलकंठ शिंदे सर यांचा पंढरपुरात सत्कार

 सायकल विक्रमवीर नीलकंठ शिंदे सर यांचा पंढरपुरात सत्कार

सांगोला (प्रतिनिधी) पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त सायकलवारी रिंगण व स्नेह मेळावा संत तनपुरे महाराज मठातील प्रांगणात आयोजित करण्यात आला होता या एक दिवसीय सायकल अधिवेशनात पंढरपूर सायकलर्स क्लब व नाशिक सायकल फाउंडेशन यांच्या वतीने पंढरपूर येथे प्रमुख पाहुणे उमेशमालक परिचारक व इतर मान्यवर यांच्या हस्ते 



सांगोला ते कन्याकुमारी सायकल रॅली यशस्वी केल्याबद्दल सांगोल्यातील विक्रमवीर सायकलिस्ट नीलकंठ वामनराव शिंदे सर यांचा सन्मान करून विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून सायकल प्रेमींची लक्षणीय उपस्थिती होती. येथील सर्व सायकलिस्टने कन्याकुमारी रायडचे अभिनंदन व कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments