४ जणांच्या पायाला हळद-कुंकू लावून, लिंबू कापून केली हत्या
मुंबई : शहरात गुरुवारी खळबळ उडविणाऱ्या दळवी रुग्णालय इमारतीमधील हत्या आणि आत्महत्या प्रकरणाचा तपास तपासादरम्यान मृताच्या घरात कापलेले लिंबू आणि मृतदेहांच्या पायाला हळद-कुंकू लावण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे अंधश्रद्धेतून हि हत्या झाली असावी, या अनुषंगाने सध्या पोलीस तपास करत आहेत. किरण दळवी (४५), मुस्कान दळवी(२६), भूमी दळवी (१७) आणि शिवदयाल सेन (६०) अशी इमारतीत सापडलेल्या मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी याबद्दल दिलेली माहिती अशी कि, मृत किरण आणि तिची मुलगी यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना कापलेले लिंबू, हळद-कुंकू लावलेल्या अवस्थेत सापडले आहेत. तसेच गळफास घेतलेल्या भूमी आणि शिवदयाल याच्या पायाला हळद-कुंकू लावलेले आढळले. त्यामुळे हा सगळा प्रकार अंधश्रद्धेशी संबंधित असल्याचे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, बुधवारी उशिरा रात्री सेन आणि भूमी यांनी किरण, मुस्कान यांची हत्या करत स्वतः आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघड झाला. सेनकडे सापडलेल्या सुसाईड नोट हिंदी आणि इंग्रजीमध्ये असून त्यात भूमीने वडील आशिष यांना लहान भावाची काळजी घ्या, असे सांगितले आहे. त्यानुसार या सुसाईड नोट पोलीस पडताळणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवणार आहेत.


0 Comments