आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकरी, भाविक दाखल होऊ लागले आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. “पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्यात येत आहे,” असा महत्वाचा निर्णय शिंदे यांनी घेतला.
एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी विविध विभागातील अधिकाऱ्यांची आढाव बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रथम राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानांतर त्यांनी मुख्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा करून त्यांना यासंदर्भात सूचना केल्या.
त्यानंतर शिंदे यांनी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल घेतला जाणार नसल्याचा निर्णय जारी केला. तसेच टोलमाफीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.


0 Comments