सांगोला नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय कार्यालयासह रस्त्यांच्या कामासाठी वीस कोटीचा निधी मंजूर :- आमदार शहाजीबापू पाटील
बायपास काँक्रीटीकरण रस्त्यासाठी अधिकचा सहा कोटी निधी
सांगोला/प्रतिनिधी:: सांगोला नगर परिषदेची प्रशासकीय नवीन इमारत व शहरांतर्गत असणाऱ्या विविध रस्ते कामांसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांचेकडून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. दि २१ जुलै च्या शासन निर्णायाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडून सदर मागणीची पूर्तता करीत २० कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली
सदरचा २० कोटीच्या निधीला मंजुरी देत असताना यातील नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत बारा कोटी निधी मंजूर झाला आहे. तर यापूर्वी महुद रोड ते मिरज पंढरपूर बायपास रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी विशेष रस्ता अनुदान योजनेतून पाच कोटी निधी मंजूर होता यामध्ये नव्याने अधिकच्या ६ कोटी निधीची वाढ करण्यात आली असून सदरच्या बायपास रस्त्यासाठी एकूण ११ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
याशिवाय कडलास रोड ते बाळू भोईटे घरापर्यंत रस्ता करणे १६ लाख खारटवाडी पर्यंत रस्ता करणे २६ लाख कडलास रोड वासुद पाटी पश्चिम बाजू ते इंगोलेवस्ती भीमराव इंगोले घर ते अनिल जगन्नाथ केदार घरापर्यंत रस्ता करणे ५८ लाख विनोद बेले घर ते माण नदीपर्यंत रस्ता करणे ५० लाख पाटील वस्ती कॅनॉल येथे बाळू घोंगडे घरापासून उत्तरेस तानाजी काका पाटील शंकर फुले ते अरुण पाटील घरापर्यंत रस्ता करणे ५० लाख असे एकूण विशेष रस्ते अनुदानातून ८ कोटी रुपये व वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रशासकीय इमारतीसाठी बारा कोटी असा एकूण वीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यापूर्वी सांगोला नगरपरिषद अंतर्गत असणाऱ्या विविध कामांसाठी ३० कोटी रुपयांचा निधी दूर झाला आहे त्यामध्ये २१ जुलै रोजी रोजीच्या शासन निर्णयाने वीस कोटी निधीची अधिक भर पडल्याने एकूण शहर विकास कामांसाठी ५० कोटीचा निधी मंजूर झाला असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.


0 Comments