ब्रेकिंग ! पुढील तीन दिवस धोक्याचे , अतिवृष्टीचा इशारा
राज्यातील बऱ्याच भागांत पाऊस पडत असून नागरिकांना दिलासा मिळालेला आहे . राज्यातील मुंबई , ठाणे , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , पुणे सातारा , कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे . हवामान विभागाच्या माहितीनुसार ठाणे , मुंबई , रत्नागिरी येथे 12 जुलै पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे .
हवामान विभागाच्या माहितीनुसार , पश्चिम महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस सातारा , कोल्हापूर , सोलापूर , सांगली तसेच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आली आहे . गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार कोसळत असल्याने अनेक धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहेत्यामुळे दरवाजे उघडण्यात आले आहेत .
दरवाजे उघडल्याने नद्यांच्याही पाणीपातळीत वाढ झाली आहे . त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आली असून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .


0 Comments