Breaking News

खळबळजनक। विधवा भावजय, दोन मुलींसह पेटवून दिले घर जमिनीच्या वादातून दिराने केला जीवे मारण्याच्या प्रयत्न

 खळबळजनक। विधवा भावजय, दोन मुलींसह पेटवून दिले घर जमिनीच्या वादातून दिराने केला जीवे मारण्याच्या प्रयत्न

जमिनीच्या वादातून विधवा भावजय व तिच्या दोन मुलींना घरासह पेटून देवून जीव मारण्याच्या प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील कोनड बुद्रुक गावात घडली . ही घटना 3 जुलै रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली . जखमी महिला व तिच्या दोन मुलींवर बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होता त्यांना तिथून संभाजीनगर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे . याप्रकरणी पुनम परिहार हिच्या फिर्यादीवरुन जाफराबाद पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील कोनड गावातील ही घटना आहे . मंगलाबाई परिहार यांच्या पतीचा मृत्यू पाच महिन्यापूर्वी झाल्याने या पुनम आणि राजेश्वरी या आपल्या दोन मुलींसोबत शेतात राहत आहेत . मात्र गेल्या अनेक दिवसांपासून महिलेचा दीर जमिनीच्या वाटणीवरून सतत वाद घालत होता . चार दिवसापूर्वी मंगलबाई या पेरणी करत असताना दिर समाधान रामसिंग परिहार यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती . रविवारी 3 जुलै रोजी रात्री तीनच्या सुमारास मंगलबाई मुलींसह झोपली असताना घरात अचानक धूर येत असल्याचे मुलीच्या लक्षात आले . तिने बहिणीला आणि आईला उठवले . मात्र तेव्हा घराला आग लागली असल्याचे त्यांच्या लक्षात येताच मंगलबाई यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला . मात्र दरवाजाची कडी बाहेरून लावली असल्याने त्यांनी खुर्ची घेऊन बाहेर हात घालून कडी उघडून बाहेर पळ काढला.


तेव्हा बाहेर फवारणी पंप पाठीवर घेऊन उभ्या असलेल्या दिर समाधान परिहार याने फवारणी पंप पुतणींच्या अंगावर मारून हातात असलेल्या टेभा अंगावर फेकून आग लावली . यात मंगलबाई परिहार गंभीर तर दोन पुनम व राजुरेश्वरी या दोघी किरकोळ भाजल्याने त्यांना ग्रामस्थांनी चिखली येथील खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.


पूनम राजेश्वर परिहार या मुलीच्या तक्रारीवरून जाफराबाद पोलीस ठाण्यात आरोपी समाधान रामसिंग परिहार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे . बुलढाण्यात उपचार सुरू होता त्यांना तिथून संभाजीनगर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यातआले सध्या त्यांच्या उपचार संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात सुरू आहे.

Post a Comment

0 Comments