Breaking News

सांगोला तालुक्यातील शेतकरी सूतगिरणीची निवडणूक जाहीर

 सांगोला तालुक्यातील शेतकरी सूतगिरणीची निवडणूक जाहीर

सांगोला :  शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीचेही बिगुल वाजल्याने सर्वपक्षीय नेतेमंडळीसह इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे . १७ जागांसाठी ११ जुलैपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे . 

१३ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे . दरम्यान , सांगोला नगरपरिषद व शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाच्या या दोन्हीही निवडणुका एकाच महिन्यात होत असल्यामुळे तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांचा कस लागणार आहे . स्व . माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर सांगोला नगरपरिषद व शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या प्रथमच निवडणुका होत आहेत . 

या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षापुढे विरोधी शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस ( आय ) , भाजपचे मोठे आवाहन असणार आहे . असे असले तरी आमदार शहाजी बापू पाटील , माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील , प्रा . पी . सी . झपके , ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांचीही शेतकरी सूतगिरणीच्या निवडणुकीसाठी महत्त्वाची भूमिका असणार आहे . त्या दृष्टीने शेकापचे नेते ' बिनविरोधची ' चाचपणी करीत आहेत .

 दरम्यान , दोन दिवसांपूर्वीच सांगोला नगरपरिषदेच्य पंचवार्षिक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने सर्वपक्षीय नेत्यांच्या तसेच इच्छुकांच्या वेगाने हालचाली होत आहे . येत्य २२ जुलैपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे . इकडे सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या १५ जागांसाठी सोमवार , ११ ते शुक्रवार , १५ जुलै या कालावधीत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत .

 सोमवार , १८ रोजी अर्जाच छाननी , मंगळवार १ ९ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे . बुधवार , ३ ऑगस्ट रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिध्द , तर शनिवार १३ ऑगस्ट रोज सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे . १४ आगस्ट रोजी दुसऱ्या दिवशी मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत टिकुळे यांनी सांगितले . 

सांगोला येथील शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक - ● निवडणुकीसाठी कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघातून ७ , बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदार संघातून ४ , संस्था मतदारसंघातून १ , अनुसूचित जाती - जमाती राखीव मतदारसंघ - १ , महिला प्रतिनिधी मतदारसंघ २ , इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघ - १ , भटक्या विमुक्त जाती - जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी -१ असे एकूण १७ सदस्य निवडून द्यायचे आहेत . सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या ११ हजार ५६० सभासदांपैकी कापूस उत्पादक शेतकरी ७ हजार ९ ३ , तर बिगर कापूस उत्पादक शेतकरी ४ हजार ४६७ असे एकूण ११ हजार ५६० सभासद ( मतदार ) आहेत , तर संस्था प्रतिनिधी -८१ मतदारांची संख्या आहे

Post a Comment

0 Comments