Breaking News

सातारा हादरले ! भरदिवसा डोक्यात गोळी झाडून तरुणाचा खून

 सातारा हादरले ! भरदिवसा डोक्यात गोळी झाडून तरुणाचा खून

सातारा :  सातारा शहरातील नटराज मंदिर परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून खून केला. ही घटना आज (दि.२) दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन खून झालेल्या युवकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. 


दरम्यान, मृत युवक वाईचा असून पूर्ववैमनस्यातून ही घटना झाल्याचे सांगितले जात आहे.याबाबत प्राथमिक माहिती अशी, आज दुपारी मंदिर परिसरात एक युवक थांबलेला होता. याचवेळी दोघेजण दुचाकी वरून आले व त्यांनी युवकाच्या जवळ जाऊन बंदुकीतून त्याच्या डोक्यात गोळी झाडली. दुपारी तेथे वर्दळ कमी असते. यामुळे नेमके काय झाले, हे कोणाला समजले नाही. मात्र गोळीच्या आवाजाने काही जण घटनास्थळी आले. यावेळी युवक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. याची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


दरम्यान, मृत युवक वाई मधील असून पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

Post a Comment

0 Comments