Breaking News

सांगोला पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून सुमारे 43 लाख 66 हजार रु.किंमतीचा 218 किलो गांजा केला जप्त....गाडी चालकास अटक....

 सांगोला पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून सुमारे 43 लाख 66 हजार रु.किंमतीचा 218 किलो गांजा केला जप्त....गाडी चालकास अटक....

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला महुद दिघंची रोडवर पोलिसांनी संशयावरून थांबलेल्या संशयास्पद वाहनास संशय आल्याने हटकले असता चालकाने गाडी वेगाने पळविली पण पोलिसांनी पाठलाग करून त्या गाडीस पकडून गाडीतून 43 लाख 66 हजार रु.किंमतीचा 218 किलो गांजा व 12 लाख रु.चे वाहन पकडून एकजनास ताब्यात घेतल्याची घटना शुक्रवार दि 8 जुलै रोजी पहाटे 3 वा च्या सुमारास सांगोला तालुक्यातील महुद दिघंची रोडवर घडली आहे संग्राम मल्लप्पा पुजारी रा. पुसेगाव ,भवानीनगर ता. खटाव जि. सातारा मूळ रा. मारुतीनगर मुद्देविहाळ ता.मुद्देविहाळ जि.विजापूर, कर्नाटक असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव होय.


  याबाबत हकीकत अशी सपोफॉ कल्याण ढवणे, सुनील लोंढे व इतर कर्मचारी शुक्रवार दि 8 रोजी पहाटे तीन वा च्या सुमारास रात्रगस्त करीत असताना महुद बु. ते दिघंची जाणारे रोडवर महूद बुद्रुक ता सांगोला हद्दीत रोडच्या कडेला एम एच 43 एजे 2327 ही सिल्वर रंगाची इनोव्हा गाडी पोलिसांना अंधारात संशयास्पद रित्या थांबलेली दिसून आली पोलिसांना सदर गाडीचा संशय आल्याने पोलिसांनी वाहनातून खाली उतरून गाडी चालकास आवाज दिला असता चालकाने दार न उघडता गाडी सुरू करून वेगाने दिघंची कडे जाऊ लागला लागलीच पोफौ ढवणे व पोकॉ लोंढे यांनी गस्तीसाठी आणलेले सरकारी वाहन माघारी वळवून त्या गाडीचा पाठलाग करून सदरचे वाहन पकडले व अधिक चौकशी करून गाडी चालकास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव संग्राम मल्लप्पा पुजारी असल्याचे सांगितले त्याच्याकडे सदर वाहनांमध्ये काय आहे 


याबाबत विचारपूस केली असता त्याने गाडीत नऊ पोती असून त्यामध्ये गांजाची पॉकेट्स असल्याचे सांगितले पोलीस पथकाने गाडीतील पोती उघडून खात्री केली असता प्रत्येक पोत्यामध्ये चिकटपट्टीने पॅक केलेली गांजाची पॅकेट्स मिळून आली पोलिसांनी संग्राम पुजारी यांस ताब्यात घेऊन सदर गाडीतून सुमारे 43 लाख 66 हजार 400 रु किंमतीचा 218 किलो गांजा व बारा लाख रुपये किमतीची इनोव्हा गाडी तसेच मोबाईल संच व दोन नंबर प्लेट जप्त केली आहे याबाबत सांगोला पोलीस ठाणे येथे संग्राम पुजारी यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला


 असून पुढील तपास पोनि अनंत कुलकर्णी हे करीत आहेत यातील आरोपींनी सदर गांजा कोठून आणला व तो गांजा कोणाला विक्री करणार होते याबाबत माहिती घेऊन अधिक तपास करणार असल्याचे पो नि अनंत कुलकर्णी यांनी सांगितले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती तेजश्री सातपुते ,हिम्मत जाधव अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ,उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील पो नि अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोफौजदार कल्याण ढवणे,पोना लिंबाजी पवार, विशाल लेंडवे, राहुल कोरे ,मुजावर गणेश कुलकर्णी ,सुनील लोंढे ,संभाजी काशीद यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments