बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळला 38 वर्षीय महिलेचा मृतदेह
बिडकिन : येथील सावता नगर परिसरात सायंकाळी अंदाजे ५ वाजेदरम्यान किरायाणे राहणारे कुटुंबातील ३८ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सदरिल महिलेचे नाव राधा अशोक भगुरे,वय ३८ वर्षे,रा.गेवराई बार्शी,ता.पैठण,ह.मु.सावतानगर,बिडकिन असे आहे.यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,सदर महिलेचा भाऊ,चुलत भाऊ,व गेवराई बार्शी येथील सरपंच हे किरायाने राहत असलेल्या सावता नगर येथील भगुरे यांच्या घरी आले असता घराला कुलुप होती
व घरातुन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने त्यांनी बिडकिन पोलिस ठाणे येथे कळवले असता घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत या घटनेचा खुलासा केला.भगुरे कुंटुब मागील सात ते आठ वर्षांपासून बिडकिन येथे राहत असुन जवळच दाल मिल चा गृहउद्योग हि करत होते.दरम्यान, या महिलेला एक अल्पवयीन मुलगा व एक मुलगी असून हे दोघेही मागील काही दिवसांपासून पती अशोक भगुरे याच्या भावाकडे गेले होते.
अशोक भगुरे हे मात्र फरार आहे.सदरिल घटनेची बिडकिन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पैठण उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.या घटनेचा तपास पैठण उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनीष जाधव हे करित आहेत.
बिडकिन परिसरात मागील महिन्यात ६५ वर्षीय वृद्धेची हत्या झाल्याची घटना घडली होती त्यामुळे आजची घटना ही आत्महत्या किंवा हत्या याबाबत नागरिकात मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले आहे


0 Comments