Breaking News

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत 13 जुलै 2022 रोजी होणार संपन्न

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत 13 जुलै 2022 रोजी होणार संपन्न

आरक्षण सोडत जाहीर होताच काही इच्छुक उमेदवारांची बल्ले बल्ले तर काहींची हुर्रे होणार

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आगामी निवडणुकीसाठी आरक्षणाची तारीख 13 जुलै 2022 रोजी आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिले आहेत महाराष्ट्र राज्यातील 25 जिल्हा परिषद व अंतर्गत असणाऱ्या 284 पंचायत समितीमध्ये आरक्षण सोडत सात जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान राज्य निवडणूक आयोगाचे आदेश जाहीर केलेला आहे या आदेशानुसार सात जुलै रोजी आरक्षण सोडतीची सूचना वर्तमानपत्रात प्रसिद्धी करावयाच्या असून 13 जुलै 2022 रोजी सर्व संवर्गाच्या आरक्षण सोडत घेण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहेत.


राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांच्या जिल्हाधिकारी यांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांच्याकरिता आरक्षण जागा निश्चित करण्याकरता सोडतीचा कार्यक्रम राबविण्यात यावा असे त्यांनी आदेशात नमूद केले आहे 25 जिल्हा परिषद व 284 पंचायत समितीच्या प्रभाग रचना व सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेले आहेत सदरचा कार्यक्रम 27 जून 2022 रोजी अंतिम प्रभाग रचना शासन राज्यपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जिल्हा परिषद आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे तर पंचायत समिती आरक्षण तहसील कार्यालयात होणार आहे इच्छुक उमेदवारांमध्ये आरक्षण नेमकं काय निश्चित होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे तर काही इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सामोरे जाण्यासाठी जय्यत तयारी केलेली आहे नेमकं 13 जुलै रोजी आरक्षण जाहीर झाल्यावर ज्या उमेदवारांनी मागील काही प्रभागांमध्ये जय्यत तयारी केली आहे 13 जुलै नंतर स्पष्ट दिसून येणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही उमेदवारांचे बल्ले बल्ले तर काही उमेदवारांची हुर्रे होण्याचे संकेत दिसून येत आहेत.

Post a Comment

0 Comments