Breaking News

सरकार वाचवण्यासाठी ‘यांना’ करा मुख्यमंत्री; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला !

 सरकार वाचवण्यासाठी ‘यांना’ करा मुख्यमंत्री; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला !

मुंबई – विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला. एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेचे जवळपास ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होत आहे. या भेटीआधी दोन्ही नेत्यांचे फोनवरून संवाद साधला. या संवादात सरकार वाचवायचे असेल तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला आहे. सरकार अल्पमतात असल्याने पवारांनी हा सल्ला दिला आहे.


दरम्यान, सत्तास्थापनेवेळी शरद पवारांनी बैठकीनंतर मला बोलावले. तेव्हा तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. कारण दोन्ही पक्षात ज्येष्ठ नेते होते. मग जिद्दीने अनुभव नसताना मी जबाबदारी स्वीकारली. राजकारणात वळणे असतात. आजपर्यंत मला प्रशासनाने खूप सहकार्य केले. होय, मला धक्का बसला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगितले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर समजू शकतो. दोघांची विचारसरणी वेगळी आहे. मात्र त्या दोघांनी माझ्यावर भरवसा ठेवल्यानंतर माझ्याच लोकांना मुख्यमंत्री नको असतील तर राजीनामा देण्यास तयार आहे असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

Post a Comment

0 Comments