Breaking News

‘येथे’ भूकंपाचे तीव्र धक्के: ९५० जण मृत्यूमुखी; जनजीवन विस्कळीत!

 ‘येथे’ भूकंपाचे तीव्र धक्के: ९५० जण मृत्यूमुखी; जनजीवन विस्कळीत!

नवी दिल्ली: भारताचे शेजारील राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले. हे धक्के ६.१ रिश्टर स्केलचे होते. भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. भूकंपामुळे वित्तहानी झालीच आहे परंतु, याशिवाय मोठ्या प्रमाणावर जिवीतहानीही झाली आहे. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत तब्बल ९५० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे. तर सुमारे ६०० लोक हे गंभीर जखमी असल्याचेही सांगितले जात आहे.


असोसिएट प्रेसच्या हवाल्याने ANI ने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात बुधवारी सकाळी भूकंपाचे तीव्र स्वरूपाचे धक्के बसले. त्यामुळे अफगाणिस्तानच्या ठराविक भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. सुरूवातीला सुमारे २५५ पेक्षाही अधिक लोक मृत्युमुखी पडले असल्याची माहिती दिले होती. यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात होता. त्यानंतर आता मात्र हा आकडा ९५० पर्यंत पोहोचला आहे. आणि मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.


एका इन्टरनेट वाहिनीच्या वृत्तानुसार, इस्लामाबादसह इतर शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतानमध्ये हे धक्के जाणवले. फैसलाबाद, अबोटाबाद, स्वात, बुनेर, कोहाट आणि मलकांडी येथेही हे धक्के जाणवले. दरम्यान रिश्टर स्केलवर ७.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप मध्यम धोकादायक मानला जातो.

Post a Comment

0 Comments