Breaking News

पत्नीशी बोलणाऱ्या तरुणाचा पतीने कापला प्रायव्हेट पार्ट

पत्नीशी बोलणाऱ्या तरुणाचा पतीने कापला प्रायव्हेट पार्ट

इंदूर: अनेक लोक हे संशयी  स्वभावाचे असतात. त्यांना  आपल्या बायकोसोबत कोणी बोलले  तरी ते त्याला आवडत नाही. बायकोशी बोलणाऱ्या तरुणाचा या व्यक्तीला इतका राग आला की त्याने त्याला बायको करवी घरी बोलावून त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून  त्याला ईजा पोहचवली आहे.  प्रकरण इंदूर मधील गांधीनगर येथील आहे. 

 

  ज्या तरुणावर हल्ला करण्यात आला त्याचं नाव अजय आहे. त्याच्या शेजारी राहणाऱ्या सुभाष नावाच्या व्यक्तीच्या पत्नीसोबत त्याची मैत्री होती.  गेल्या तीन महिन्यांपासून दोघं एकमेकांशी बोलत होते. हे सुभाषला आवडत नव्हतं. दीड महिन्यांपूर्वी यावरून सुभाष आणि अजयचं भांडणही झालं. त्यानंतर अजयने सुभाषच्या बायकोशी बोलणं बंद केलं.

पण आता काही दिवसांपासून ते दोघं पुन्हा बोलू लागले. त्यांना आपसात बोलताना सुभाषने पाहिलं आणि त्याच्या रागाचा पारा चढला. त्याने काही तरी कारण देत आपल्या बायकोला अजयला घरी बोलावायला भाग पाडलं. सुभाषच्या बायकोने अजयला आपल्या घरी बोलावलं.


जेव्हा अजय त्यांच्या घरी आला तेव्हा सुभाष आणि त्याची बायको दोघांनीही त्याला एका खोलीत बंद करत त्याला मारहाण केली. सुभाषने चाकूने अजयचा गुप्तांग कापून टाकला.  त्यानंतर अजयला तात्काळ एमवाय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जातं आहे. लल्लूरामच्या वृत्तानुसार या प्रकरणाचा गांधीनगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments