Breaking News

सांगोला -पंढरपूर महामार्गावर एका दिवसात दोन अपघात..

सांगोला -पंढरपूर महामार्गावर एका दिवसात दोन अपघात..
पंढरपूर महामार्गावरील बसचा टाकळीनजीक अपघात! 

 पंढरपूर जिल्ह्यात आज बुधवारी दोन ठिकाणी अपघात झाले आहेत. या अपघातात एकूण तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. एक अपघात हा पिकअप वाहनाचा झाला आहे. तसेच दूसरा अपघात हा एसटी बसचा झाला आहे.


पंढरपूर ते सांगोला राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी मेथवडे फाट्यावरील टोल नाक्यावर पिकपचा अपघात झाला. या अपघातामध्ये चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामधील जखमींना सांगोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


सांगोल्याहून पिकअप पंढरपूरकडे येत होती. दरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टोल नाक्यावरील डिव्हायडरला जोरदार धडक दिली. दूसरीकडे पंढरपुरात एसटी बसला अपघात झाला. आज पहाटेच्या सुमारास ही बस पंढरपूरहून कराडला निघाली होती. टाकळी बायपास रोडवरच्या डिव्हायडरला बसची जोरात धडक बसली. यामध्ये तीन‌ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments