Breaking News

महाराष्ट्र राज्यात तख्तापालट होणार काय?

 महाराष्ट्र राज्यात तख्तापालट होणार काय?

 महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका वर्ष 2019 ला पार पडल्यानंतर राज्यातील राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नाही, शिवसेनेने भाजप बरोबर असलेली 25 वर्षांची युती तोडली.

मात्र निवडणुकीपूर्वी भाजप व सेना युतीत लढले असल्याने जनतेनी त्यांना बहुमत दिले होते मात्र उद्धव ठाकरे यांनी युती धर्माला फाटा फोडत महाविकास आघाडीची स्थापना केली.

राष्ट्रवादी कांग्रेसचे सुप्रीमो शरद पवार व कांग्रेस सोबत शिवसेनेने महाविकास आघाडीची स्थापना करीत राज्यात सत्ता काबीज करीत खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. 


मात्र सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीनंतर राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणुकीत पक्षातील आमदार फुटले, निवडणुका संपताच शिवसेनेचे निष्ठावन्त एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत 40 आमदारसाहित गुजरात गाठले.

सध्या महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आली आहे, राज्याच्या या राजकीय वातावरणावर चंद्रपूरचे वरिष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक प्रशांत विघ्नेश्वर यांनी आपली बेधडक प्रतिक्रिया News34 ला दिली आहे. 


शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडत हिंदुत्वाच्या मुद्द्याला बगल देत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या एकाही निष्ठावंत कार्यकर्त्यांवर विश्वास दाखविला नाही व स्वतः मुख्यमंत्री बनले. 

स्व. बाळासाहेब ठाकरे हे किंगमेकर म्हणून आयुष्य जगले त्यांनी कधी स्वतः मुख्यमंत्री बनण्याची इच्छा जाहीर केली नाही मात्र उद्धव ठाकरे यांनी उलट केले.

शिवसेना महाविकास आघाडीत समाविष्ट झाल्याने पुढील राजकीय भवितव्य काय? यावर ते अज्ञभिज्ञ राहिले.

एकनाथ शिंदे यांचं बंड हे पूर्वनियोजित आहे, उद्धव ठाकरे यांचा अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर आता पुढचा मुख्यमंत्री कोण बनणार? राष्ट्रवादी व कांग्रेसचा मुख्य पदावर डोळा आहे, मात्र शिवसेना तसे काही होऊ देणार नसल्याने तुटलेल्या युतीवर डॅमेज कंट्रोल करण्याचा हा एक डाव आहे.

शिंदे यांच्या बंडावर अनेक आमदार त्यांच्या समर्थनात आहे, शिवसेना हा कट्टर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि एकावेळी 40 आमदार फुटने ही न पटणारी गोष्टचं. 

जर शिवसेना महाविकास आघाडी सोबत असणार तर मुंबई महानगरपालिका ते कधी वाचवू शकणार नाही, मुंबईचा बालेकिल्ला शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचा आहे, त्याला सुरुंग पडू नये यासाठी शिवसेनेने मोठी रणनीती आखली आहे.

शिवसेनेची पुढची खेळी काय?

वरिष्ठ पत्रकार विघ्नेश्वर यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की 40 आमदारांचे समर्थन हे भाजपला देत मुख्यमंत्री भाजपचा तर उपमुख्यमंत्री शिवसेनेचा बनण्याची शक्यता आहे त्यानंतर उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुखाची भूमिका पार पाडतील.

महाविकास आघाडी मध्ये मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्यावर अनेकांची भाजपसोबत युती तोडल्याची खदखद मनात होती मात्र पक्षाचा आदेश म्हणून कार्यकर्ते गप्प होते.

नंतर कोरोनाचा भीषण काळ आला त्या काळात कुणी याबाबत बोलण्याची हिंमत केली नाही, मात्र अडीच वर्षे पूर्ण झाल्यावर शिवसेना राजकीय भविष्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे.

मात्र मधल्या काळात हनुमान चालीसा व धार्मिक स्थळावरील भोंग्याच्या वादात शिवसेना बंधने घालण्यात अयशस्वी ठरली ज्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुन्हा उजाळा मिळाला व शिवसेनेची प्रतिमा धुमीळ न व्हावी यासाठी शिवसेनेने ही रणनीती आखली आहे. 

सदर तख्तापालट नाट्य लवकर संपणार असून शिवसेना भाजपसोबत पुन्हा युती करीत नवी सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांना सादर करणार.

कारण आजही एकनाथ शिंदे बेधडक सांगत आहे आम्ही शिवसेना सोडली नाही, म्हणजे शिंदेचा गट हा शिवसेनेचाचं आहे.ते वेगळ्या पक्षात जाणार नसून शिवसेनेतच राहून पूर्ण परिस्थिती हाताळणार असल्याची शक्यता आहे.

चोकट:-

सेना भाजप युतीचे सरकार बनणार. एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव ऊध्दव ठाकरे स्विकारणार. हे सगळे नाटक चालू आहे. सगळे आधीच ठरले आहे. 

१) एकनाथ शिंदे बंड करणे शक्य नाही.

२) बंड केलेच तर ३५ आमदार जाणे हे शक्य नाही.

 शिवसेनेला भाजप बरोबर जायचेच आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची संपली आहे. तसे ही करुन खुर्ची खाली करायचीच होती. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री घेण्यापेक्षा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री घेतलेले चांगले. याचे फायदे असे.

१) उपमुख्यमंत्री पद

२) वाढीव मंत्री पदे.

३) केंद्रात एखादे मंत्री पद

४) ईडी पासून‌ चौकशी बंद होईल.

आणि सगळ्यात महत्वाचे सेना भाजप एकत्र येण्याचे कारण

५) *मुंबई महानगरपालिका ताब्यात राहणार.*

हे सगळे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ठरवून चालले आहे. पब्लिक येड्यासारखी टिव्ही समोर बसून आहे. सेनेला भाजपकडे जाण्यासाठी ठोस कारण पाहिजे. ते कारण म्हणजे 

*एकनाथ शिंदे*


Post a Comment

0 Comments