Breaking News

व्होकल फॉर लोकल अभियानामुळे निर्यातीला चालनाव्होकल फॉर लोकल अभियानामुळे निर्यातीला चालना

 व्होकल फॉर लोकल अभियानामुळे निर्यातीला चालनाव्होकल फॉर लोकल अभियानामुळे निर्यातीला चालना

 व्होकल फॉर लोकल अभियानामुळे निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी केले. उद्योग आणि निर्यातदारांनी आपले दीर्घकालिन निर्यात उद्दिष्टे ठरवण्याचे आवाहनही त्यांनी केले. वाणिज्य भवन या वाणिज्य मंत्रालयाच्या इंडिया गेट परिसरातील नव्या इमारतीचे लोकार्पण करतांना मोदी बोलत होते, यावेळी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते.  


व्होकल फॉर लोकल अभियानामुळे आमच्या देशातील उत्पादने जगातील अनेक देशात पहिल्यांदाच पाठवण्यात आली आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी या अभियांतर्गंतच एक जिल्हा एक उत्पादन योजनाही राबवण्यात येत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.गेल्या आठ वर्षांत निर्यातीत वाढ होण्यासोबत याच्याशी संबंधित अनेक उद्दिष्ट गाठण्यातही सरकारला यश आले आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, निर्यातीत वाढ करण्यासाठी निर्यातीविषयक धोरणात आणि प्रक्रियेत सुलभता तसेच लवचिकता आणण्यात आली आहे. यामुळे आपल्या देशातील उत्पादने जगातील बाजारपेठेत उतरवण्यात मोठी मदत झाली आहे. प्रत्येक मंत्रालय आणि विभाग निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे कृषी, परराष्ट्र, वाणिज्य तसेच उद्योग आणि सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योग मंत्रालय यादृष्टीने सामूहिकपणे काम करीत आहे.

 

निर्यातीत वाढ करण्यासाठी निर्यातदारांनी आवश्यक त्या सूचना सरकारला कराव्या. व्यापार सुलभ करण्यासाठी सरकारने अनावश्यक अशा 32 हजार तरतुदी आणि प्रक्रिया रद्द केल्या आहेत. जागतिक पातळीवर अनेक अडचणी असतानाही मागील वर्षी भारताची निर्यात 670 अब्ज डॉलर्सवर गेली होती. हे आकडे यासाठी महत्त्वपूर्ण आहे की, ते विकसनशील देशाला विकसित देश बनवू शकतात, असे पंतप्रधान म्हणाले. मोदी यांनी यावेळी निर्यात पोर्टलचाही शुभारंभ केला.

Post a Comment

0 Comments