Breaking News

जिल्हा परिषद निवडणूक ; राजकीय भूकंपामुळे सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण शांतच

 जिल्हा परिषद निवडणूक ; राजकीय भूकंपामुळे सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण शांतच 

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेत तालुक्यात ११ हारकती आल्या होत्या. त्या फेटाळल्या गेल्याने प्रारूप रचनेत कोणताही बदल झाला नसल्याने प्रारूप रचनाच अंतिम राहिली आहे. प्रभाग रचना अंतिम झाली असली तरी सध्याच्या राजकीय भूकंपामुळे कोणता पक्ष, गट कोणाबरोबर युती करतो यावरच गट, गणातील उमेदवार ठरले जाणार आहेत. सध्या तरी राज्यातील राजकीय भूकंपामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण मात्र शांतच आहे

 

सांगोला तालुक्यात नवीन एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समितीच्या गणात वाढ झाली आहे. तालुक्यात नवीन वाढेगाव, चोपडी, अकोला हे गट असणार आहेत. नवीन रचनेमुळे सर्वत्र नागरिकांत चर्चा सुरू झाली आहे. नवीन प्रारूप रचना कोणासाठी फायद्याची-तोट्याची असणार याबाबत मत-मतांतरे व्यक्त होत आहेत. नवीन प्रारूप प्रभाग रचनेनुसार सांगोला तालुक्यात ८ • जिल्हा परिषद गट व १६ पंचायत समितीचे गण असणार आहेत. एक जिल्हा परिषद व पंचायत समिती २ सदस्य वाढणार आहेत. नवीन प्रारूप रचनेनुसार अनेक गावांची आदलाबदल झाली असून ही नवीन गावे नव्या जिल्हा परिषद गटामध्ये कोणासाठी फायद्याचे ठरणार हे पहावे लागणार आहे. तालुक्यात महुद आणि जवळा ही दोन गावे नेहमीच राजकीय केंद्रबिंदू म्हणून पाहिली जात आहेत.


 येथूनच तालुक्याच्या नवीन राजकीय दिशा ठरविला जातात. परंतु नवीन प्रारूप रचनेमध्ये जवळा जिल्हा परिषद गट रद्द झाल्याने या गटातील गावे वाढेगाव व कडलास जिल्हा परिषद गटामध्ये विभागली गेली आहेत. सध्याच्या प्रारूप रचनेनुसार आपल्याच पक्षाला, गटाला कसा फायदा होणार आहेत. गटांमधील नवीन गावे व वगळलेली गावे कशाप्रकारे फायद्या-तोट्याची झाली आहे

Post a Comment

0 Comments