Breaking News

आ. शहाजीबापूंच्या घरावर शिवसेनेची नोटीस ...

 आ. शहाजीबापूंच्या घरावर शिवसेनेची नोटीस ...

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. पक्षाने त्यांच्या विरोधात नोटीस बजावली असून ही नोटीस आ. पाटील यांच्या चिकमहूद (ता. सांगोला) येथील घरावर चिटकवण्यात आली आहे. सांगोला तालुक्यात यामुळे खळबळ उडाली आहे.


सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात नोटीस बजावली असून ही नोटीस आमदार पाटील यांच्या चिकमहूद (ता. सांगोला) येथील घरावर जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी चिटकवली आहे. शिवसेनेच्या पक्ष प्रतोदनी काढलेली ही नोटीस आहे. मातोश्री येथील पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहा, अन्यथा पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटिसीत देण्यात आला आहे. या नोटिशीमुळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे.



पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटिसीत देण्यात आला आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ३५ आमदारांना घेऊन महाराष्ट्र विकास आघाडीविरोधात बंड पुकारले आहे. त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांमध्ये सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी मातोश्री येथील शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. शिवसेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी बुधवारी आमदार पाटील यांच्या घरावर नोटीस चिकटवली.



पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी बुधवारी आमदार पाटील यांच्या घरावर नोटीस चिकटवली.

आमदार शहाजीबापू पाटील यांचा राजकीय प्रवास

सांगोला तालुक्यातील राजकारणात अॅड. पाटील हे शेकापचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांचे कट्टर विरोधक समजले जातात. सांगोला विधानसभा निवडणुकीत १९९० पासून सलग पाच वेळा अॅड. शहाजीबापू पाटील यांनी आमदार देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसकडून लढत दिली आहे. १९९५ साली त्यांनी गणपतराव देशमुख यांचा पराभवही केला होता. १९९९,२००४ व २००९ या विधानसभेच्या तिन्ही निवडणुकीत त्यांनी ८० हजारांपेक्षा जास्त मते घेतली होती.


विद्यार्थीदशेपासून काँग्रेसमध्ये

अॅड. पाटील हे विद्यार्थिदशेपासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. ते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते समजले जात होते. २०१९ पूर्वी त्यांच्या राजकीय करिअरमध्ये ते एकदाच आमदार बनले होते. दरम्यान, सततच्या पराभवानंतर कॉंग्रेसकडून विधान परिषद किंवा एखाद्या महामंडळावर वर्णी लागेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरल्यानंतर पाटील हे सांगोला तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवकांसह अनेक गावांचे सरपंच व हजारो कार्यकर्ते घेऊन शिवसेनेत दाखल झाले.


आमदार शहाजीबापू पाटील हे गेल्या ५० वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत. आजपर्यत काँग्रेस, अपक्ष, शिवसेना या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली आहे. शेकापचे सर्वेसर्वा स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्याबरोबर त्यांनी तब्बल सातवेळा आमदारकी लढवली. त्यामध्ये १९९५ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून शहाजीबापू पाटील हे १९२ मताने विजयी झाले. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये भाजप-शिवसेनेचे सरकार आले. विरोधी सरकार असूनही सांगोला तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची शिरभावी ही ८१ गावची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आमदार पाटील यांचे मोठे योगदान राहिले आहे.


भाजप – शिवसेनेशी सलगी

शहाजीबापू पाटील यांचे त्यावेळीपासून भाजप व शिवसेनेच्या नेत्यांशी संबंध आले होते. २०१९ च्या निवडणुकीत गणपतराव देशमुख यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्याशी त्यांची लढत झाली. यावेळी शेकाप व राष्ट्रवादी यांची आघाडी होती. पण ही आघाडी धुडकावून राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार दीपक आबा साळुंखे – पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना उघड मदत केली होती. त्याचबरोबर माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवडणुकीवेळी शहाजीबापू पाटील यांनी मदत केली. याची दखल घेऊन निंबाळकर यांनीही आपल्या पक्षाबरोबरच त्यांनी स्वतःची ताकत लावून पाटील यांना मदत केली होती.

Post a Comment

0 Comments