Breaking News

नव्या सरकारचा रविवारी होणार शपथविधी?

 नव्या सरकारचा रविवारी होणार शपथविधी?

 राज्यात तब्बल अडीच वर्षे एकमेकांच्या हातात हात घालत चांगल्या रीतीने महाविकास आघाडी सरकार चालत होते. या सरकारला व शिवसेनेला शिवसेनेतीलच गटनेते एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करत सुरुंग लावला. त्यांनी नुसता सुरुंगच लावला नाही तर आपल्यासोबत निम्म्याहून अधिक सेनेचे आमदारही घेऊन गेले. शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर काल शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ हे शासकीय निवासस्थान सोडावे लागले. आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर नवे भाजपचे सरकार येणार असून एकनाथ शिंदे गट व भाजप यांच्या एकत्रितरित्या निर्माण केलेल्या नव्या सरकारचा रविवारी शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मोठ्या प्रमाणात राज्यात राजकीय घडामोडी घडत असल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच कोसळले असून भाजपने नवी खेळी खेळत सत्ता खेचून आणण्यात यश मिळवले आहे. शिवसेनेतील शिंदे गटाने बाहेर पडत भाजपसोबाबत सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

0 Comments