google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बारावीचा आज ऑनलाईन निकाल, पहा एका क्लिकवर

Breaking News

बारावीचा आज ऑनलाईन निकाल, पहा एका क्लिकवर

 बारावीचा आज ऑनलाईन निकाल, पहा एका क्लिकवर 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी दुपारी एकनंतर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे प्र-सचिव माणिक बांगर यांनी मंगळवारी दिली.


विद्यार्थ्यांना वेबसाईटवरून निकालाची प्रत घेता येईल. ऑनलाईन निकालानंतर बारावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छाया प्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी 10 ते 20 जूनपर्यंत आणि छायाप्रतीसाठी 10 ते 29 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.


17 जूनला मिळणार गुणपत्रिका…

बारावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत 17 जून रोजी दुपारी तीन वाजता वितरित करण्यात येतील, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.


कोल्हापूर विभागातील 1 लाख 24 हजार विद्यार्थ्यांचा समावेश

एक वर्षानंतर झालेल्या बारावीच्या ऑफलाईन परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर होणार आहे. कोल्हापूर विभागातून 768 केंद्रातून 1 लाख 24 हजार 442 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये कोल्हापूर (52 हजार 822), सांगली (34 हजार 20), सातारा (37 हजार 600) विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

1. https://hsc.mahresult.org.in

2. www.hscresult.mkcl.org

3. www.mahresult.nic.in

www.mahresult.nic.in तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळांवर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Post a Comment

0 Comments