google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपालिका निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

Breaking News

सांगोला नगरपालिका निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

 सांगोला नगरपालिका निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर 

सांगोला (प्रतिनिधी): राज्यभरातील नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रमाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी केली.


सांगोला नगरपरिषदेच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सांगोला नगरपालिकेच्या सदस्य पदाच्या आरक्षणाच्या सोडतीकरता जिल्हाधिकारी शुक्रवार दि. १० जून रोजी नोटीस प्रसिध्द करतील.


नगरपरिषदेच्या सदस्यपदाची आरक्षणाची सोडत काढणे, अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीमधील महिला व सर्वसाधारण प्रभागातील महिलांची आरक्षणाची सोडत सोमवार दि. १३ जून रोजी सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जाहीर करतील. बुधवार दि. १५ जून रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे आरक्षणाची अदि सुचना कलम १० नुसार रहिवाशांच्या माहितीसाठी हरकती तसेच सुचना मागविण्यासाठी वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रसिध्द करतील.


बुधवार दि १५ जून ते मंगळवार दि. २१ जून पर्यंत जिल्हाधिकारी आरक्षण व सोडतीच्या अनुशंगाने हरकती व सुचना मागवतील, शुक्रवार २४ जून रोजी जिल्हाधिकारी आरक्षण व सोडतीचा अहवाल संबंधीत विभागीय आयुक्त तथा प्रदेशिक संचालक नगर परिषद प्रशासन यांच्याकडे पाठवतील. बुधवार २९ जून रोजी नगरपरिषदेच्या सदस्य पदाच्या आरक्षणास संबंधित विभागीय आयुक्त मान्यता देतील. शुक्रवार दि. १ जुलै रोजी सदस्य पदाच्या आरक्षणाची अदि सुचना रहिवाशांच्या माहितीसाठी वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नगरपालिकेच्या वेबसाईटवर जिल्हाधिकारी प्रसिध्द करतील.

Post a Comment

0 Comments