google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह; राज्यसभा मतदानाचं काय?

Breaking News

ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह; राज्यसभा मतदानाचं काय?

 ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह; राज्यसभा मतदानाचं काय?

मुंबई :कोरोनाचा विषाणू पुन्हा एकदा महाराष्ट्रात थैमान घालत आहे. एकट्या मुंबई शहरात मागच्या 7 दिवसात दुप्पट रुग्णवाढ झाली आहे. कोरोनाचा प्रभाव वाढत असताना राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त आहे.


त्यांनी ट्वीटरवरुन कोरोना लागण झाले असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी संपर्कात आलेल्यांनी त्वरीत आपली तपासणी करुन घ्यावी असे आवाहन केले आहे. सध्या ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. मात्र आता लागण झाली असताना ते राज्यसभेचे मतदान कसे करणार? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.


राज्यसभा निवडणूक चार दिवसांवर आली असताना एकेका मतासाठी झटणारे फडणवीस स्वतःच मतदानाला मुकू शकतात का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान आता नव्या नियमानुसार, फडणवीस यांची पुन्हा तिसऱ्या दिवशी कोविड टेस्ट करण्यात येईल. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यास देवेंद्र फडणवीस निश्चितपणे राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करु शकते.


देशात जीवघेण्या कोरोनानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 24तासात देशात कोरोनाच्या 3 हजार 962 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर यापूर्वी शुक्रवारी 4 हजार 41 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांपैकी अर्ध्याहून अधिक रुग्ण केरळातील आहेत.

Post a Comment

0 Comments