कोळे ता सांगोला येथे पोलिसांची अवैध वाळू तस्करावर कारवाई....34 लाख 18 हजार रु किंमतीचा मुद्देमाल जप्त
सांगोला (प्रतिनिधी) गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या आदेशाने पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत जेसीबी, ट्रॅक्टर व टिपर आदी वाहने जप्त करून 34 लाख 18 हजार रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांना ताब्यात घेतले असल्याची घटना शनिवार दि 18 जून रोजी पहाटे 2 वा कोळे (इमडेवाडी) ता सांगोला येथे घडली आहे.
मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना सुनील मोरे,दत्तात्रय तोंडले व गायकवाड हे पोलिस सांगोला हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारकडून माहिती मिळाली की कोळे ,इमडेवाडी ता सांगोला येथील सरकारी ओढ्यावर बिरु महादेव सरगर रा कोळे हा अवैध वाळू उपसा व साठा करून त्याची विक्री करीत असल्याचे सांगितले
त्यानुसार शनिवार दि 18 जून रोजी पहाटे 2 वा. च्या सुमारास पोलीस लागलीच खाजगी वाहनाने बातमीचे ठिकाणी जाऊन खातरजमा केली असता बिरू महादेव सरगर रा कोळे हा तेथील ओढ्यात जेसीबी,टिपर व ट्रॅक्टर च्या सहाय्याने वाळू उपसा करीत असताना दिसून आला
पोलिसांना पाहताच इतर 3 इसम पसार झाले पोलीसानी जागेवरून एम एच 10 सीएन 1572 या क्रमांकाचा 14 लाख 50 हजार रुपये किमतीचा जेसीबी, 15 लाख रुपये किमतीचा टिपर , साडेचार लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर व 3 ब्रास वाळू असा एकूण 34 लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत पो ना सुनिल मोरे यांच्या फिर्यादीनुसार बिरू महादेव सरगर रा कोळे, विशाल होनमाने रा जुनोनी ता सांगोला या दोघांसह अन्य तीन जनावर गुन्हा दाखल केला आहे.


0 Comments