पतीच्या आळशीपणाला वैतागली पत्नी! हत्या करून शरीराचे तुकडे उकळविले कढईमध्ये!
नवी दिल्ली: एका महिलेने आपल्या आळशी पतीला वैतागून टोकाचे पाऊल उचलले आहे, ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. पत्नीने आपल्या आळशी आणि कामचोर पतीला वैतागून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करून एका कढईमध्ये उकळविले.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव टेरेसा आहे. टेरेसा ही आपल्या पतीच्या आळशीपणाला वैतागली होती. टेरेसाने पतीला पहिल्यांदा ड्रग्ज देऊन बेशुद्ध केले आणि त्यानंतर त्याची हत्या केली.पतीची हत्या करून टेरेसाचा राग कमी झाला नाही. त्यानंतर तिने पतीच्या शरीराचे छोटे-छोटे तुकडे केले. पुन्हा तेच तुकडे एका कढईमध्ये उकळविले. ही घटना सर्बिया जरंजनीन शहरातील आहे. १० मे रोजी रात्री ९ वाजता ही भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे.
0 Comments