अरेरे! 300 रुपयांची लाच घेताना पालिका शिक्षण मंडळाची लिपिक रंगेहाथ सापडली
सोलापूर : आरटीई 25% प्रवेश अंतर्गत कागदपत्र पडताळणी होऊन प्रवेश पत्र देण्यासाठी पाचशे रुपयाची लाच मागून तीनशे रुपये स्वीकारताना सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळातील निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या महिला लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
श्रीमती प्रभावती अंबादास वाईटला (कस्सा), वय ५८ वर्षे, पद–लिपीक, नेमणूक म. न. पा.प्राथमिक शिक्षण मंडळ, सोलापुर रा. माधव नगर, लक्ष्मीनारायण टॉकिज जवळ, सोलापुर. असे अँटी करप्शन विभागाने अटक करण्यात आलेल्या महिला लिपिकाचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांच्या मुलीचे आरटीई २५ टक्के अंतर्गत सोलापुर सोशल आसोशियसन्स न्यु इंग्लिस स्कुल, सोलापुर येथे नंबर लागला असुन त्या अनुषंगाने महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ, कार्यालय सोलापुर येथुन कागदपत्राची पडताळणी होवुन प्रवेश पत्र मिळणे आवश्यक असते सदरचे प्रवेश पत्र यातील आलोसे यांनी
आज दि. १३.०५.२०२२ रोजी तक्रारदार यांना देवुन केलेल्या शासकीय कामाचा मोबदला म्हणुन तक्रारदार यांच्याकडे ५००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३००/- रुपये स्विकारले असता आलोसे यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून पुढील कार्यवाही करीत आहोत. या सापळा पथकात पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोह सोनवणे, मपोना स्वामी, पोना घाडगे, पोशि जानराव यांचा समावेश आहे.
0 Comments