सत्यशोधक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सौरभ हॉटेल मंगळवेढा येथे मिटींगचे आयोजन केले
मंगळवेढा येथे अध्यक्ष माननीय सागर तायडे साहेब त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख चंद्रकांत सरतापे यांच्या आदेशानुसार मंगळवेढा या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष विजय शिकतोडे यांनी सौरभ हॉटेल मंगळवेढा येथे मिटींगचे आयोजन केले
त्यावेळी तालुकाध्यक्ष मसुद कळकुंबे यांची निवड करण्यात आली त्यात त्याचबरोबर तालुका सचिव किशोर कदम त्याचबरोबर शहराध्यक्ष अमित लोखंडे यांना पुष्पगुच्छ देऊन विजय शिकतोडे निवड केली त्यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले असंघटित कामगार बेरोजगार हक्कासाठी देशामध्ये एकमेव संघटन सत्यशोधक संघटना आहे
याची स्थापना 1982 झाली महात्मा ज्योतिराव फुले व यांचे शिष्य राव बहादुर नारायण लोखंडे या सत्यशोधक नेतृत्वाखाली मिलमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा हितासाठी देशव्यापी संप घडवून आणला व संगम मजबूत केले आपण या संघटने मध्ये सामील होऊन महापुरुषांची विचारधारा पुढे नेली पाहिजे कामगाराच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे त्यांच्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे असे मत व्यक्त केले त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष विजय शिकतोडे यांनी देखील मत व्यक्त केले
ते बोलताना म्हणाले 142 असंघटित कामगार संख्या दिवसेंदिवस वाढत आहे दिवसेंदिवस त्यांचा अन्याय होत आहे यापुढे हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही संघटनेच्या माध्यमातून त्याला न्याय देण्यात येईल असे मत व्यक्त केले त्याचबरोबर तालुकाध्यक्ष कळकुंबे शाहू फुले आंबेडकर याचा वास वारसा असणाऱ्या संघटनेशी प्रामाणिकपणे काम करून गाव तिथे शाखा उघडणार आहे
अशी घोषणा केली त्याचबरोबर मंगळवेढ्याचे नगरसेवक प्रवीण खवतोडे साहेब यांच्या कार्याला भेट देऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करून त्यांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी महादेव सावजी संतोष लोकरे सुदाम दत्तू जागीर पटेल बरेच कार्यकर्ते उपस्थित होते व पदाधिकारी निवडला शुभेच्छा देण्यात आल्या



0 Comments