google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विवाहितेच्या दोन भावांकडून डोके ठेचून पतीची हत्या;

Breaking News

विवाहितेच्या दोन भावांकडून डोके ठेचून पतीची हत्या;

 विवाहितेच्या दोन भावांकडून डोके ठेचून पतीची हत्या; 

हैदराबाद: हैदराबादमध्ये बुधवारी संध्याकाळी पत्नीसह मोटरसायकलवरून घरी जाणाऱ्या तरुणाची दोघांनी लोखंडी रॉडने वार करून हत्या केली. हत्या झालेल्या युवकाचे नाव बी. नागराजू असे आहे. त्याची पत्नी सय्यद अश्रीन फातिमा हिच्या नातेवाईकांनी ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. फातिमाच्या दोन भावांना आरोपी करण्यात आले असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.


घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे. त्यामध्ये नागराजूचे डोके ठेचून त्याची हत्या झालेचे स्पष्ट दिसत आहे. हल्लेखोरांसमोर नागराजूची पत्नी फातिमा असहाय्य दिसत आहे. या हत्येनंतर नागरिकांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला पण ते पसार होण्यात यशस्वी झाले.


प्राप्त माहितीनुसार, नागराजू आणि फातिमा यांनी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते. ते दोघे दहावीपासून एकमेकांना ओळखत होते. जानेवारीमध्ये हैदराबादमधील आर्य समाज मंदिरात त्यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर फातिमाने तिचे नाव बदलून पल्लवी ठेवले होते. फातिमाच्या कुटुंबीयांनी नागराजूला धमकी देऊन तिच्या पासून दूर राहण्यास सांगितले होते.

Post a Comment

0 Comments