आटपाडी तालुक्यातील अल्पवयीन मागासवर्गीय मुलीवर बलात्कार !
आटपाडी तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय मागासवर्गीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाणवन ता.माण येथील २५ वर्षीय तरुणाला आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,आटपाडी तालुक्यातील एका गावातील मागासवर्गीय समाजातील १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जीगर चंद्रकांत शिंदे (वय २५ वर्षे, रा.पाणवण ता.माण जि.सातारा) याने लग्नाचे आमिष दाखवून तिला फूस लावून पळवून नेले व तिच्या इच्छेविरुद्ध व संमतीशिवाय तिच्यावर बलात्कार केला.
ही घटना ७ मेे रोजीच्या सुरू रात्री १.३० वा. ते १३ मे,२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी एका महिलेने आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून दि. ८ मे रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आज अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भा.दं.वि.सं.कलम ३७६(२),(आय)(जे)एन), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३(अ), ४(३),५(४),(एल)सह अ.जा.अ.ज.प्र. का.कलम ३(२) (Va) ३(१) (w) (i) (ii) प्रमाणे तसेच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विटा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पुढील तपास करीत आहेत.
0 Comments