ट्रॅक्टर चालकाने, ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार!
बीड: जीवे मारण्याची धमकी देत उसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर, ट्रॅक्टर चालकाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना, बीडच्या दिंद्रुड गावात घडली आहे. देवीच्या कुमारीका पुजेसे नकार देत, हा प्रकार एक महिन्यानंतर मुलीने आईला सांगितला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील उसतोडणी करणारी एक टोळी, कर्नाटकमध्ये काम करून माजलगाव तालुक्यातील टालेवाडी तांडा येथे, 16 एप्रिल रोजी कामासाठी आली होती. येथील शिवारातील एका उसाच्या फडात, ऊस तोडणीचे काम सुरु होते.त्यावेळी, ट्रॅक्टर चालक पमू कुरेने टोळीतील एका मजुराच्या अल्पवयीन मुलीवर, शेतात नेऊन अत्याचार केला.
याशिवाय, कोणाला सांगितले तर तुला व तुझ्या आईला जीवे मारेल, अशी धमकीहि ट्रॅक्टर चालकाने दिली. यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने हा घडलेला प्रकार कोणालाच सांगितला नाही. मात्र, मुलीच्या घरी देवीची कुमारिका पूजा आयोजित केली होती. यावेळी मुलीने पूजा करण्यास नकार दिला. याचा जाब आईने विचारला असता, मुलीने टालेवाडी तांडा येथील शेतात ट्रॅक्टर चालक पमु कुरे याने जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची आपबिती घडलेला सर्व प्रकार सांगितला.
0 Comments